भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशार दिला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले आहे याची माहिती जनतेला द्यावी, असे भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. तसेच नंदकिशोर चतुर्वैदी यांच्या कंपन्यांची यादी समोर आल्याचे सांगत त्यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय हे नंदकिशोर यांचा वापर करत आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी यांचे ठाकरेंसोबत आर्थिक व्यवहार असून आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक व्यवहार असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. नंदकिशोर चतुर्वैदी यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत? असा सवालदेखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्या मालकीच्या तीन कंपन्या आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
कर्करोगग्रस्त रुग्णांचा कुटुंबीयांसाठी ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’
एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!
देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम कंपनी असून, या कंपनीशी ठाकरे यांचा काय संबंध आहे हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. श्रीजी होम कंपनीत २९ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा झाल्याचेही यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले.