‘साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?’

‘साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?’

शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्या पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर भाजपाचे साडेतीन लोक तुरुंगात असतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदा कसल्या घेता. सरकार तुमचेच आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

आताच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावीत. लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी उद्याची पत्रकार परिषद होत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदा कसल्या घेता. सरकार तुमचेच आहे. थेट कारवाई करा. मला टाका ना जेलमध्ये, मी येतो बॅग भरून, असे किरीट सोमय्या म्हणाले. साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. पत्रकार परिषदेसाठी त्यांनी संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यावरून भरकटू नका, असा खोचक सल्लाही दिला आहे.

प्रत्येक पक्षाला पत्रकार परिषद घेण्याचा हक्क आहे. सोमय्यांनी गुन्हा केला असेल तर मी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करणार. पण इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी कोणी तरी सकाळी उठून पाच पानी पत्र रिलीज करणार… ईडीने डेकोरेटरला बोलवलं डोक्यावर बंदूक ठेवली, असं सांगणार याला काही अर्थ नाही. ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला समोर आणलं पाहिजे. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

संजय राऊत यांच्या तोंडी ‘बरबाद’ करण्याची भाषा

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

कोविड घोटाळा झालेला आहे. सर्व त्यात फसले आहेत. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून यांचे साडेतीन लोकं, एक लोकं. दोन लोकं सुरू आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

मला मूळ मुद्दा भरकटवायचा नाही. कोविड काळात माफीया सेनेने कमाई केली. कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्याला जनता माफ करणार नाही आणि मी ही सोडणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Exit mobile version