31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारण‘संजय राऊत, उद्धव ठाकरेंना वाटतं केंद्रीय तपास यंत्रणांची तोंडे बंद करु शकतो’

‘संजय राऊत, उद्धव ठाकरेंना वाटतं केंद्रीय तपास यंत्रणांची तोंडे बंद करु शकतो’

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईबाबत माहिती समोर येताच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

संजय राऊत, प्रविण राऊत, वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर यांचे व्यवहार समोर आले आहेत. अलिबाग येथील काही जमीनी आणि दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. संजय राऊत यांना अगोदरच लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी १० महिन्यांपूर्वी ईडी कार्यालयात ५५ लाख रुपये परत केले होते. ईडीची चौकशी सुरु होती आणि गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड सुरु होती, असे किरीट सोमय्या म्हणाले.

पत्र लिहिणे, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर आरोप करणे ही त्यांची अवस्था समजून येत होती, असा टोला किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना वाटतं की पोलिसांचा माफियाप्रमाणे वापर करुन ईडी, सीबीआय, आयटी अधिकारी यांची तोंडे बंद करु शकतो, अशी टीका त्यांनी केली आहे. एक हजार ३८ कोटी रुपयांचा घोटाळा यात प्रविण राऊत मुख्य आरोपी होते. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले. त्या पैशातून अलिबाग आणि दादरला जमीन खरेदी करण्यात आली. कारवाईच्या भीतीने संजय राऊत यांनी ५५ लाख परत केले, असे किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे इस्लामिक स्टेट, सिरियाशी कनेक्शन

मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जाब विचारायला हवा होता. ५५ लाख रुपये परत दिल्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी संजय राऊत यांची चौकशी करायला हवी होती. मात्र, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना जेलमध्ये टाका असे हे म्हणतात. गृहमंत्री भाषण करतात, ईडीच्या विरोधात एसआयटी करतोय. ही घटना कुणी लिहिली आहे. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे घटना लिहिणार आहेत का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा