भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना लवकरच अटक होणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊतांबद्दल प्रविण राऊतांनी जे काही सांगितले आहे त्यानंतर मी एवढंच सांगेन की अनिल देशमुख यांच्या डावी आणि उजवीकडील खोली उद्धव ठाकरेंनी सॅनिटाईज करावी. प्रविण राऊतांपासून इतरांनी ईडीला जी माहिती दिली आहे. त्यावरून अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच जेलमध्ये जावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या दोघांसाठी अनिल देशमुख यांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाईज करून घ्याव्यात, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
एकनाथ आव्हाडांचे ‘शब्दांची नवलाई’ बालकवी पुरस्कारने सन्मानित
ठाकरे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे अडचणीत
आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका चहावाल्याला जम्बो कोविड सेंटरचे १०० कोटींचे कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये भेट दिली. हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेलचा मालक तिथे हजर नव्हता. वाईन कंपनीसाठी पॉलिसी बदलली गेली. संजय राऊत पार्टनर बनले. जी कंपनी अस्तित्वात नाही त्यांना कंत्राट दिले. एका चहावाल्याला कंत्राट दिले. कोविड कंपनी कधी स्थापन झाली नाही त्यांना कंत्राट कसे दिले गेले? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.