‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’

‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’

आज, ३१ जुलैला सकाळीच ईडचं पथक खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात संजय राऊत यांच्यावर टीका होत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, त्यांना सगळा हिशोब द्यावा लागणार असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.

ईडीचे लोक अनेक दिवस संजय राऊत यांना विनंती करत होते, हिशोब द्या पण राऊतांनी ऐकलं नाही. अखेर ईडीच पथक त्यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं होतं. राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचं सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना त्यांनी आतही टाकलं आहे. पत्राचाळमध्ये बाराशे कोटींचा घोटाळा झाला. आता नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचं आहे. मलिकांच्या शेजारी राऊतांची जागा व्हायला हवी असं महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. हे राऊत धमक्या देत होते. पळापळ करत होते. हिशोब देत नव्हते. आता त्यांना हिशोब द्यावा लागणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

किरिट सोमय्या ट्विट करत म्हणाले की, संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

संजय राऊत ईडीचणीत

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

सकाळीच ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. जवळपास १० ते १२ अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version