‘संजय राऊतांनी पुरावे द्यावेत, मी चौकशीला सामोरे जायला तयार’

‘संजय राऊतांनी पुरावे द्यावेत, मी चौकशीला सामोरे जायला तयार’

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी आज, ७ एप्रिल रोजी पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतच्या नावावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी या भ्रष्टाचाराची माहिती जनतेसमोर आणावी असे आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना केले आहे. आम्ही ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर आणत आहोत आणि आणत राहणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी पुरावे द्यावेत, मी चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कालपासून संजय राऊत यांनी आरोपे केलेत पण अद्याप एक कागदही पुरावा म्हणून समोर आणलेला नाही, अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. ट्रॉम्बे येथील पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे. पण त्या एफआयआरची एकही कॉपी अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे सरकारचे एक एक मंत्री फसत आहेत त्यामुळे यांची नौटंकी सुरू असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हे ही वाचा:

‘सोमय्यांनी आधी हिशोब द्यावा मग मी पुरावे देतो’

सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

येवा नेपाळ आपलाच आसा

धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

संजय राऊत यांनी काल सोमय्या यांच्यावर आरोप केल्यानंतर लगेचच किरीट सोमय्या यांनी पुरावे समोर आण असे आव्हान केले होते. पुरावे मुख्यमंत्र्यांना द्या. मुख्यमंत्री तुमचेच आहेत. आतापर्यंत १७ आरोप केलेत त्याचं काय झालं? असा खोचक सवालही त्यांनी विचारला होता.

Exit mobile version