‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’

‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या काही मालमत्तांवर ईडीने टाच आणल्यावर त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोप करण्यापेक्षा त्यांनी पुरावे मुख्यमंत्र्यांना द्यावेत, असे आव्हान त्यानी संजय राऊत यांना केले आहे.

“मी काही घोटाळा केल्याचा संशय असेल, तर संजय राऊत यांनी आरोप करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुरावे द्यावेत. मुख्यमंत्री तुमचेच आहेत. उगीच या प्रकरणात टाईमपास करून वेळ वाया घालवू नका,” असा खोचक सल्ला किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिला आहे. संजय राऊत यांनी आतापर्यंत १७ आरोप केलेत त्याच काय झालं? असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत सध्या गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावेत. संजय राऊत यांनी अनेक आरोप केलेत. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू पाहतायत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे ही वाचा:

भाजपा स्थापना दिन; देशभरातून निघणार शोभायात्रा

आता आयएनएस विक्रांतसाठी संजय राऊतांचा आकांत

श्रीलंकेतील आणीबाणी रद्द

कलम ३७० हटवल्यानांतर, नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला करणार पहिला दौरा

संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या एका कंपनीविरोधात भारत सरकारने कालच मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कंपनी जानेवारी २०२१ मध्ये स्थापन केली. दोन महिन्यांत परवानगी मागितली, कोविड कामे मिळवली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Exit mobile version