‘ईडी आणि आयकरच्या कारवाईपासून लक्ष विचलित करण्यासाठीच मलिकांचे आरोप’

‘ईडी आणि आयकरच्या कारवाईपासून लक्ष विचलित करण्यासाठीच मलिकांचे आरोप’

मंत्री नवाब मलिक हे रोज एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप लावत आहेत. नवाब मलिकांनी देंवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीसांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर पलटवार केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही यापूर्वी दिवाळीनंतर फटाके फुटणार असा इशारा दिला होता. मात्र, आज दिवाळीपूर्वीच किरीट सोमय्यांनीही पत्रकार परिषद घेऊन टीकेची झोड उठवली आहे.

‘ईडी आणि आयकर विभागाने केलेल्या कारवाईपासून लक्ष विचलित करण्यासाठीच मलिक हे आरोप करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच १ हजार ५० कोटींची बेनामी संपत्ती कुठून आली याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

कारवां ‘शालिमार’ चा

‘पवार कुटुंबीयांचे जावाई मोहन पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? घोटाळ्याचे हे सगळे पैसे अजित पवारांनी संपूर्ण कुटुंबामध्ये वितरीत केले आहेत. बिल्डरांच्या खात्यातून अजित पवारांच्या खात्यात आलेले पैसे कुठे गेले’, असेही सवाल त्यांनी केले आहेत.

अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही नवाब मलिकांची एवढी कपॅसिटी नाही, हे घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

Exit mobile version