‘घोटाळा केला असेल तर तुम्हीच सरकारी पाहुणे व्हाल’

‘घोटाळा केला असेल तर तुम्हीच सरकारी पाहुणे व्हाल’

मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून आज- उद्यामध्ये सरकारी पाहुणे घरी येणार असल्याचे सूचक ट्विट केले होते. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंबंधी त्यांनी ‘टीव्ही ९’शी संवाद साधला. घोटाळा केला असेल त्यात नाव असेल तर तुमच्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार तर तुम्हालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. चौकशी सुरू आहे तर मलिक यांचे नाव आहे का किंवा त्यांचे नातेवाईक यात अडकले आहेत का, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

हे ही वाचा:

‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’

बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?

… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद

किरीट सोमय्यांनी भावना गवळी यांच्यावरही टीका केली आहे. भावना गवळींनी आर्थर रोड तुरुंगात अनिल देशमुख यांच्या शेजारच्या खोलीची  त्यांनी बुकिंग करायला हवी, असा टोला सोमय्यांनी भावना गवळी यांना लगावला आहे. भावना गवळींना ईडीचे तीन समन्स गेले आहेत. मात्र, त्या हजर राहिलेल्या नाहीत. ईडीने त्या मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे. त्यांना लवकरच हजर होण्याचे निर्देश कोर्ट देणार आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबईत १४४ लागू करण्यात आला आहे त्यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले ठाकरे सरकारचे काम म्हणजे कोणतेही आदेश काढायचे आणि नंतर स्वतःच ते भंग करतात. यांच्याकडे आता एकच काम उरले आहे ते म्हणजे उरलेल्या दिवसात जास्तीत जास्त पैसा गोळा करणे. घोटाळे अंगाशी आल्यामुळे उगाचच लोकांमध्ये लॉकडाऊनची भीती पसरवत आहेत, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

Exit mobile version