भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज किरीट सोमय्या सांताक्रूझ पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांची मालमत्ता पाहण्यासाठी गेलो होतो म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे , असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो होतो. त्यांनी केलेल्या दबावामुळेच हा गुन्हा दाखल झाला आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. एफआयरची प्रत आमच्याकडे सुपूर्द केली आहे. पण, ही एफआयआर हास्यास्पद असल्याचा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. मालमत्ता पाहणीसाठी गेले असताना कोरोना संबंधीचे नियम मोडल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजारो लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संजय राऊतांच्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करत नाही. पण, छगन भुजबळांची मालमत्ता पाहण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांवर का गुन्हा दाखल करतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
हे ही वाचा:
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’
कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात
उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्राला लुटणार, तेव्हा किरीट सोमय्या गप्प बसणार असे होऊ शकत नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मला तुरुंगात हजार वेळा टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करणार, असा इशारा देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. शिव्यांचा शब्दकोश घेऊन एकदाच काय त्या शिव्या द्या. दररोज असे बोलू नका, असा खोचक सल्ला किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना दिला आहे.