‘मंत्रालयात माझा फोटो काढणारा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती?’

‘मंत्रालयात माझा फोटो काढणारा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती?’

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयात फाईल्स तपासणी करत असतानाचा फोटो समोर आला होता त्यावरून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली होती. याचवरून किरीट सोमय्या यांनी गुरुवार २७ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाला गुन्हा दखल करण्याचे आदेश दिले आहेत. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे किरीट सोमय्या म्हणाले. गुन्हा काय तर किरीट सोमय्या हे खुर्चीवर बसले आहेत, दोन कर्मचारी सेवेत आहेत हाच गुन्हा आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. मंत्रालयातील चोरी किरीट सोमय्या यांनी पकडली आणि हे खुन्नस एका साध्या लिपिकावर काढत आहेत. राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करत आहात लढाई किरीट सोमय्या यांच्याशी करा, अमित शहा यांच्याशी करा, असे किरीट सोमय्या म्हणाले.

फोटो काढला, ज्याने अपलोड केला त्याला नोटीस पाठवायला हवी, असे किरीट सोमय्या म्हणाले. फोटो कोणी काढला हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. तुमच्याकडे मंत्रालय सुरक्षा विभाग आहे. किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा आहे. मंत्रालयात सुरक्षा आहे. मात्र, कोणत्या कायद्याच्या आधारे ही नोटीस दिली आहे. उद्धव ठाकरे यांचा कायदा आहे का? यांची ठोकशाही आहे का? असे खोचक प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

हे ही वाचा:

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार

‘महापौर, वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थन करत आहात का?’

भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये कोण ठरणार सरस?

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

जानेवारीमध्ये अर्ज केला होता. फाईल्स अवलोकनसाठी विचारले होते. तरीही फोटोवर प्रश्न विचारले जात आहेत की, गुप्त फाईल्स कशा दिल्या, खुर्ची कशी दिली? उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या कार्यालयात चौकशी करा, असे किरीट सोमय्या म्हणाले. त्यांच्या कार्यालयातही पाहणी करून आलो, असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज करून ही सर्व पाहणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. असे असताना त्या व्यक्तीने फोटो काढले, म्हणजे हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असायला हवे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

Exit mobile version