‘ठाकरे सरकारचे कोविड सेंटर घोटाळे दहा दिवसांत बाहेर काढणार’

‘ठाकरे सरकारचे कोविड सेंटर घोटाळे दहा दिवसांत बाहेर काढणार’

राज्यात आणि मुंबईत वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून नवनवे निर्बंध लावण्यात येत आहेत. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर निशाणा साधला आहे. येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येवरून आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स अद्याप रिकामे पडले आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी आकडेवारी दिली असून त्यानुसार बीकेसी मध्ये २ हजार ४०० बेड्सपैकी ८०० बेड्स वर रुग्ण ऍडमिट आहेत. दहिसरमध्ये ७५० बेड्स आहेत, पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये २ हजार बेड्सपैकी ९०० रुग्णांनी बेड्स भरले आहेत. म्हणजेच ९८ टक्के रुग्ण हे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. लसीकरण झालेले त्यातील ९९.९९ टक्के लोक हे सुरक्षित आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

चीनचा तो व्हिडीओ सैन्याचा नाहीच….

आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले

झुलन गोस्वामीच्या मुख्य भूमिकेत विराटची बायको!

सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दाम नागरिकांना घाबरवण्याचे काम करत आहेत आणि ते का करत आहेत? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. येत्या दहा दिवसांमध्ये मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

आशिष शेलार यांना आलेल्या धमकीच्या फोनविषयीही किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे. आता ठाकरे सरकार कशी काळजी घेतात ते बघूया असे किरीट सोमय्या म्हणाले.

Exit mobile version