‘१०० कोटींपैकी पवार, उद्धव यांच्या खात्यात किती गेले?’

‘१०० कोटींपैकी पवार, उद्धव यांच्या खात्यात किती गेले?’

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री एकच्या सुमारास अटक केली. या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला. अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परबांचा नंबर आहे, असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हणत मंत्री अनिल परबांवर निशाणा साधला आहे.

‘अखेर अनिल देशमुख यांना अटक झाली. १०० कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार आहे. १०० कोटींच्या वसुलीपैकी किती पैसे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या खात्यात गेले, हे आता उघड होईल. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढतील’, असे त्यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परबांचा नंबर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरीमधील दापोली येथे असलेल्या हॉटेलच्या बांधकामाबाबत सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा देखील दाखल केला आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे दिवाळी मुबारक?

UPI चा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये ४.२२ अब्ज पेमेंट!

मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या चौघांना फाशी

राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी

किरीट सोमय्या हे सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि प्रमुख नेत्यांना टार्गेट करत महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ या मंत्र्यांनंतर नंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सोमैय्यांच्या रडारवर आहेत. किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

Exit mobile version