26 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारण‘मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा डाव’

‘मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा डाव’

Google News Follow

Related

पुण्याच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवरून पडले आणि त्यांना दुखापत झाली.

यानंतर किरीट सोमय्यांनी मुंबईत पोहचल्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्यावरील हल्ला हा मुख्यमंत्र्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात ते राज्यपाल आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले. मनसुख हिरेन नंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा डाव होता. पुण्याच्या घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आल्यानंतर हे सत्य उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘माझे हातपाय तोडायला सांगितले होते. तरीही पुणे पोलीस अत्यंत सावकाश तपास करत आहेत, असेही ते म्हणाले. ठाकरे सरकारमधील घोटाळे बाहेर येणार म्हणून हे सर्व घाबरले आहेत. यामध्ये अनिल परब, संजय राऊत यांचा समावेश आहे. त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाला,’ असे सोमय्या म्हणाले. मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे वाचल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

…आणि चीनने पाकिस्तानला एक दमडीही दिली नाही

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

बुटात लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह ६० ते ७० महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर भादवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४ तसेच मु.पो.अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पुढील कारवाईसाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा