भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केलेले घोटाळे समोर आणत असतात. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला असून त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलंड आणि दहिसर येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवले असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणला (NDMA) केली आहे.
संजय राऊत मित्र परिवारचा ₹100 कोटींचा जंबो कोविड सेंटर घोटाळा
भागिदार सुजीत पाटकरची बनावट कागदी कंपनी
लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस
दहिसर वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटर्सचे कंत्राट
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ला चौकशी करण्याची विनंती pic.twitter.com/TITVAaPy23
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, केवळ कागदावर अस्तित्वात आहे अशा कंपनीला पुणे, महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी, मुलुंड आणि दहिसर येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे चेअरमन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पुणे इमारत स्लॅब दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक
सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक
दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी
तसेच आज दुपारी ४ वाजता पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्विट करून सांगितले आहे. खोटी कागदपत्रे दाखवून कंत्राट मिळवला. अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
दुपारी 4 वाजता मी शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करणार
खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला.कोविड रुग्णांचा मृत्यू झाला
गुन्हा दाखल झाला पाहिजे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022