भाजपा नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी दापोलीत दाखल झाले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे हे देखील किरीट सोमय्या यांच्यासोबत उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दापोली पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही.
यानंतर किरीट सोमय्यांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. मात्र, त्याचीही दखल पोलिसांनी न घेतल्यामुळे किरीट सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालत परबांच्या रिसॉर्टकडे निघाले. थोडे दूर गेल्यावर पोलिसांनी सोमय्या आणि राणेंना अडवलं. पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न काही भाजप कार्यकर्ते करत होते. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किरीट सोमय्या, निलेश राणे आणि निल सोमय्या यांना अटक केली. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
हे ही वाचा:
चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ
इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला ‘लव्ह जिहाद’, मुलीची हत्या
पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार
‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’
किरीट सोमय्या हे शनिवार, २७ मार्च रोजी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी आणि रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून दापोलीकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, कशेडी घाटत किरीट सोमय्या यांचा ताफा पोहचताच त्यांना खेड पोलिसांनी अडवलं. तसेच त्यांना नोटीस घेण्यास सांगितले. मात्र, यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात वाद झल्याचे दिसून आले. त्यानंतर सोमय्या यांनी पोलिसांनी दिलेली नोटीस सही न करताच स्वीकारली. दापोली येथे निलेश राणे हे किरीट सोमय्या यांच्या सोबत उपस्थित होते.