भाजप नेते किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेमध्ये येताच तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी किरीट सोमय्यांचा महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. हा सत्कार करायला पोलिसांकडून परवानगी नव्हती, मात्र तरीही हा सत्कार करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी ते पायऱ्यांवरून पडले होते आणि त्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे याच पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी याला परवानगी दिली नव्हती. तरीही भाजपचे नगरसेवक महापालिकेच्या पायऱ्यांवर जमले होते. यावेळी किरीट सोमय्यांचा शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा:
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास
यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी याच पायऱ्यांवर माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीने ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांचे नाव सांगावे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यातल्याच लोकांच्या जीवाशी खेळले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी संपत्तीवर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.