26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामासुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका

सुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका

Google News Follow

Related

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगर दंडाधिकारी यांच्याकडे लाइफलाइन हॉस्पिटल्स मॅनेजमेंट, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, हेमंत गुप्ता अशा नऊ जणांविरोधात याचिका दाखल केली आहे.

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी मी ही तक्रार करत आहे. याचिकेतील ज्यांच्याविरोधात मी तक्रार करत आहे, त्यांनी फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करत जनतेचे पैसे लुबाडले आहेत. ज्यांच्यावर हे आरोप आहेत त्यांना वैद्यकीय सुविधा, कोरोनाच्या सुविधा व व्यवस्थापनाचा पूर्वानुभव नाही.

मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारच्या टेंडरची प्रक्रिया न करता एका बनावट कंपनीला कोविड सेंटर्सचे कंत्राट दिले. सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन या कंपनीने आपल्या कंपनीची नोंदणी २६ जून २०२०ला केली असल्याचे भासविले आहे. पण त्यांनी दिलेली कागदपत्रे बोगस आहेत. ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कार्यालय नाही, अनुभव नाही अशा कंपन्यांना कोविड सेंटर चालविण्याचे कंत्राट देण्यात आले. आयसीयूचे कंत्राट अशा कंपनीला देणे म्हणजे हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळच.

सोमय्या यांनी असे म्हटले आहे की, या कंपनीला पुणे महानगरपालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकले आहे. तरीही त्यांना चार कोविड सेंटर्सचे काम देण्यात आले आहे. म्हणून या कंपनीविरोधात सोमय्या यांनी आझाद मैदान एस्प्लनेड कोर्टात याचिका दाखल केली आहे.

हे ही वाचा:

राज्यातून कोरोना निर्बंध हटणार?

ठाणे महापालिका आयुक्त शिवबंधनात?

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून होणार आणखी ‘फाइल’ उघड

मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सी यांची १९,००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

या कंपनीविरोधात गुन्हा नोंदवावा तसेच त्याचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावे, असेही सोमय्या यांनी म्हटे आहे. न्यायालयाने सेक्शन ३०४ ए, ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४२५, ४६४, ४६५, ४६८, ४७० आर डब्ल्यू, सेक्शन १२० बी व ३४ याअंतर्गत कारवाई करावी अशी विनंती सोमय्या यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा