मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लाई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आज कोर्लाई गावात पोहचले होते.
यावेळी किरीट सोमय्यांनी कोर्लाई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंचाकडून त्यांनी माहिती मिळवली. किरीट सोमय्या संबंधित जागेची पाहणी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना त्यांनी केवळ ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवक आणि सरपंचांकडून माहिती घेतली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात बंगले हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच हे बंगले कोणी पाडले याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पती उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी १९ बंगले विकत घेतले. आज जर शिवसेनेचा गद्दार सरपंच म्हणतो बंगले नाहीत. बंगले गायब झाले की, नाही याची चौकशी व्हायला पाहिजे. हे बंगले गेले कुठे? मी मोदींना विनंती करणार रश्मी उद्धव ठाकरे यांचे बंगले शोधण्यासाठी सीबीआय चौकशी करायला हवी असं सोमय्या म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
‘कुराणात हिजाब अनिवार्य आहे असे म्हटल्याचा पुरावा द्या!’
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी
हॅशटॅग अरेस्ट राणा ट्विटरवर होतोय ट्रेंड
पत्रकारपरिषदेनंतर नारायण राणेंना मुंबई महापालिकेकडून नोटीस
रायगडच्या कोर्लाई गावात उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणाच्या पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लाई गावात आले होते. किरीट सोमय्या हे तिथून निघून जाताच सरपंच प्रशांत मिसाळ म्हणाले की, किरीट सोमय्या जाणून बुजून हे करत आहेत. माहितीच्या अधिकारातून सोमय्यांनी ही माहिती मागवली, तेव्हा त्यांना सहकार्य केले. आज ते ग्रामपंचायत कार्यालयात आले, बसले, आणि काही न बोलता पत्र देऊन गेले. हा फक्त गावाला बदनाम करण्याचा डाव आहे, असेही ते म्हणाले.
अलिबागमधील १९ घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.