‘राणा दाम्पत्याचा जेलमधला अनुभव ऐकून इंग्रजांच्या जेलची आठवण’

‘राणा दाम्पत्याचा जेलमधला अनुभव ऐकून इंग्रजांच्या जेलची आठवण’

किरीट सोमय्या यांचे उद्गार

आज, ५ मे रोजी राणा दाम्पत्य तुरुंगातून जामिनावर बाहेर आले. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या गेले होते. त्यांनतर रवी राणांची सुटका झाल्यांनतर ते पत्नीच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात गेले होते त्यावेळी सुद्धा त्यांच्यासोबत सोमय्या होते. दरम्यान, किरीट यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले राणा दाम्पत्यांचे तुरुंगातील अनुभव ऐकून मी भावनिक झालो आहे.

राणा दाम्पत्य बारा दिवस तुरुंगात होते. त्यांनतर आज राणा दाम्पत्यांची भेट झाली असून, त्यावेळी राणा दाम्पत्य भावनिक झाले होते. रुग्णालयात रवी राणांना बघून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले होते. राणा दाम्पत्यांची भेट सोमय्या यांनी घेतली आहे. त्यांनतर माध्यमांशी त्यानं संवाद साधला असता ते सुद्धा भावनिक झाले होते. ते म्हणाले, राणा दाम्पत्यांचे तुरुंगातील अनुभव ऐकून मी भावनिक झालो आहे. राणा दाम्पत्यांच्या अनुभव ऐकून इंग्रजांच्या जेलची आठवण झाली आहे. माफिया सरकराने राणा दाम्पत्यांनावर तुरुंगात अत्याचार केले. त्यामुळे माफिया सरकारला जनता माफ करणार नाही.

हे ही वाचा:

उष्णतेचा कहर! जवानांनी वाळूत भाजले पापड

एलआयसी आयपीओ शेअर्सवर उड्या!

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत

बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात

पुढे ते म्हणाले, नवनीत राणांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना तुरुंगात नीट वागणूक दिली नाही. त्यांना स्पॉन्डिलायसिसचा आजार आहे. तरीही त्यांना अनेक तास उभे ठेवले त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली असतानाही पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. नवनीत राणांची यामुळे प्रकृती ढासळली तर रवी रणांनां मानसिक धक्का बसल्याचे सोमय्यांनी सांगितले.

Exit mobile version