‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’

‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यांनतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान न केलेल्यांची यादीच सांगितली. या यादीत त्यांनी काही अपक्ष आमदारांची नावे त्यांनी घेतली आहेत . त्यामुळे राऊतांना गुप्त मतदान कस कळलं, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सौमय्या यांनी केला आहे. तसेच ह्या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी मतदानाची यादी जाहीर केली. त्यांना अपक्ष आमदारांचा मतदान कसं कळलं? त्या आमदारांना मार्किंग करू दिल होत का? असे सवाल सोमय्यांनी केले आहेत. ते म्हणाले, अपक्ष आमदारांची नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. अपक्ष आमदारांना दमदाटी करून संजय राऊतांनी माफियागिरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची दखल घेऊन निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं पाहिजे. अपक्ष आमदारांनी कोणाला मतदान केलं हे फक्त निवडणूक आयोगाला माहिती असते. मग संजय राऊतांना ही यादी कशी मिळाली. त्यामुळे संजय राऊतांना या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागणार आहेत.

हे ही वाचा:

रतन टाटा मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने सन्मानित

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’

“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”

संजय राऊतांनी यादी जाहीर केल्यांनतर राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होत आहेत. त्यांच्या या यादींनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम्ही मतदान केलेलं राऊतांना कस कळलं? असा अपक्ष आमदार देखील सवाल उपस्थित करत आहेत. तर किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाने याची दाखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version