भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, ठाकरे सरकारवर अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाचे पार्टनर आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल, असे सोमय्या म्हणाले आहेत.
विमल अग्रवाल, श्रीधर पाटणकर आणि यशवंत जाधव यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली होती. सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे, यशवंत जाधव तसेच श्रीधर पाटणकर आणि बुलेट प्रूफ जॅकेट कंपनीचे विमल अग्रवाल यांचे संबंध सिद्ध झाले आहेत. यासंदर्भातील कागदपत्रे आयकर विभाग, ईडीकडे सुपूर्द केली असून, यशवंत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी केली असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात आहे, अशी गंभीर टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. विमल अग्रवाल यांनी यशवंत जाधवांचे सुपुत्र यतीन जाधवांशी भागीदारी केली आहे. या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर
जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…
मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान
पुढे ते म्हणाले, ८० कोटींचा घोटाळा मी बाहेर काढला आहे. या घोटाळ्यात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे पन्नास टक्के पार्टनर असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. गेल्या वेळी जो हसन मुश्रीफ यांचा घोटाळा सांगितला होता, त्यांच्यावर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेच यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. अनिल परबांच्या रिसॉर्टबाबत केंद्र सरकरने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. लवकरच परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश या येणार असल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच सोमय्यांनी रिसॉर्टचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करण्यासाठी रत्नागिरीच्या एमएसइबीला पत्र दिले आहे.