28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारण‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!

‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!

Google News Follow

Related

राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोडत नाही. गेले काही दिवस राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना लक्ष्य करून त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली आहे. सरकारच्या या घोटाळ्यांचा निषेध करण्यासाठी किरीट सोमैय्या यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर घोटाळेबाज सरकारच्या रावणरूपाचे दहन शुक्रवारी केले.

दसरा सणानिमित्तही सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. त्यांनी त्यांच्या मुलुंडमधील निवासस्थानाबाहेर राक्षसाचा पुतळा उभारला होता. या पुतळ्याला ‘वसुली सरकार घोटाळे’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारवर आरोप केलेल्या घोटाळ्यांची नावे या पुतळ्यावर सोमय्या यांनी लिहिली होती.

घोटाळेबाज सरकारविरोधात किरीट सोमय्यांनी रणशिंग फुंकले आहे. आज सरकारवरील विविध घोटाळ्यांच्या आरोपांचा रावणाचे ते दहन करणार होते, पण पोलिसांनी त्यांना पूर्व परवानगी न घेतल्याचे सांगून विरोध केला. १४४ ची नोटीसही बजावली. मात्र त्यांनी अखेर ते दहन केले आणि सरकारला आव्हान दिले. ‘या घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबर जेलमध्ये जावे लागले तरी हरकत नाही. जेलमध्ये जाईन पण घोटाळेबाज सरकार मुक्त महाराष्ट्र बनवून दाखवणार,’ असेही किरिट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

दसऱ्याच्या दिवशी इन्कम टॅक्सने ‘सोने’ लुटले

अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण

गृहमंत्री १०० करोड वसुली, साई रिसॉर्ट बांधकाम, जरंडेश्वर कारखाना, २१०० कोटींचे कोविड हॉस्पिटल, रेमडेसिविर कोविड घोटाळा, ९०० कोटींचा दहिसर जमीन, कोल्हापूर साखर कारखाना, बालाजी पार्टिकल कारखाना, विहंग गार्डन ठाणे, दापोली अनधिकृत बंगला, पोलीस आर. टी. ओ. ट्रान्सफर, सिटी बँक, अशा घोटाळ्यांची नावे पुतळ्यावर लिहिण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा