ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले

माजी मंत्री अस्लम शेख यांच्या मढ स्टुडिओवर अखेर हातोडा

ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले

मुंबईतील मढ भागात समुद्रकिनारी बांधलेल्या बेकायदा स्टुडिओवर बीएमसीने शुक्रवारी सकाळी बुलडोझर चालवला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ही तक्रार केली होती. माजी मंत्री अस्लम शेख यांच्या सांगण्यावरून हे बेकायदेशीर स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार या स्टुडिओच्या पाडकामाला सुरुवात झाली त्यावेळेला किरीट सोमय्या हे स्वतः सकाळी फावडे आणि हातोडा घेऊन उपस्थित होते. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले अशी जोरदार टीका किरीट सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या अनधिकृत स्टुडियोचा मुद्द्दा सातत्याने उचलून धरला होता. यासंदर्भात सोमय्या यांनी मालाड, मढ येथील ४९ बेकायदेशीर स्टुडिओ आणि २२ बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. ऑगस्ट महिन्यात किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अनधिकृत स्टुडिओ बांधण्यासाठी अस्लम शेख यांनी परवानगी दिली. ज्यात १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. शुक्रवारी मुंबई महानगर पालिकेने सुरु केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे आपल्या लढ्याला यश आल्याच्या भावना किरीट सोमय्या यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

मध्यमांशी संवाद साधतांना सोमय्या म्हणाले, आदित्य ठाकरे आणि अस्मम शेख यांनी २०२१ मध्ये हे भ्रष्टाचाराचे स्मारक बांधले. टेम्पररी स्टुडिओ म्हणून शंभर फूट उंचीचे बांधकाम केले. या स्टुडिओवर कारवाई करायला दोन वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला. उद्धव ठाकरे सरकारचे माफियागिरी आणि भ्रष्टाचारचे हे स्मारक आज उद्धवस्त करण्यास सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा:

कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर

नायजेरियात बंदुकधाऱ्याने गोळीबार करून मारले ५० जणांना

भाजपा सरकार पुरस्कार देईल असे वाटले नव्हते, पण मोदीजी तुम्ही मला चुकीचे ठरवलेत!

काँग्रेस नेते ए.के. अँटनींचे चिरंजीव अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात

मंत्री अस्लम शेख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने डझनभर स्टुडिओ बांधण्यात आले. पाच लाख स्क्वेअर फूट बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये केले. त्याला उद्धव ठाकरे सरकारने मान्यता दिली असा आरोप करून आता हा एक हजार कोटींचा स्टुडिओ तोडायला सुरुवात झाला असल्याबद्दल समाधान व्यक्त केले

Exit mobile version