सोमय्या, पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोमय्या, पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता गंभीर वळण आले असून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही मागणीसाठी संपाची हाक दिली होती. सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या असून एसटीचे विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरू ठेवले आहे. आज राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत आंदोलनासाठी दाखल होत असताना त्यांची मुंबईमध्ये अडवणूक केली गेली.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर हे मोर्चासाठी रवाना होत असताना दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी पडळकर आणि सोमय्यांना ताब्यात घेतले. मंत्रालयाबाहेर कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू असून मंत्रालयाबाहेर प्रचंड मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सदाभाऊ खोतांना मानखुर्द जवळ रोखले

फडणवीस कोणाला म्हणाले डुक्कर?

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

दरम्यान, सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेकपोस्ट इथे अडवण्यात आले. आज मंत्रालयासमोर मोर्चा काढण्यास कुठलीही परवानगी नसल्यामुळे त्यांना मानखुर्द येथेच अडवले आहे. पोलीस बंदोबस्त लावून कर्मचाऱ्यांना अडवले जात असल्याने सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध केला.

आज सकाळीच शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाला सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते. आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना रोखण्यात आल्याने पडळकरांनी सरकारवर आणि अनिल परबांवर टीकेची तोफ डागली आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्या केल्यास त्यासाठी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version