भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे दोन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. आज, १३ एप्रिल रोजी सांयकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांनी पुन्हा शिवसेनेला धारेवर धरत महाविकास आघाडीचे डर्टी डझनचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे आभारदेखील मानले आहेत.
सोमय्या म्हणाले, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा मी आभारी आहे. महाराष्ट्र पहिल्यांदा अश्या प्रकारच राजकारण अनुभवत आहे. संजय राऊत हे तर फक्त प्रवक्ते आहेत, मास्टर माइंड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेंचे घोटाळे बाहेर येऊ लागले तसे त्यांनी माझ्यावर कथित गुन्हा दाखल केला. मला न्याय मिळायला उशीर झाला मात्र ही आता सुरुवात आहे. महाविकास आघाडीच्या डर्टी डझनला शिक्षा ही होणारच, त्यांचे सर्व घोटाळे मी बाहेर काढणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, माफियागिरी पोलिसांचा वापर करणारे, हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. घोटाळा करणाऱ्या माफियांना मुक्ती मिळणार नाही. ठाकरे परीवारामधील तेजस ठाकरे, श्रीधन पटवर्धन यांनी नंदकिशोर यांच्या कंपनीत किती पैसे गुंतवले, हा सगळा मनी लाँड्रिंगचा घोटाळा संपूर्ण बाहेर काढणार आहे.
हे ही वाचा:
‘मुंब्र्यात सापडलेले दहशतवादी बाहेरून आलेले’
तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर
तसेच धक्कादायक खुलासा यावेळ सोमय्यांनी केला आहे. ते म्हणाले, दोन दिवसांनी अनिल परब यांची केस दापोली कोर्टात होणार आहे. तसेच, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव यांच्या केसला गती मिळणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले. त्याशिवाय नंदकिशोर चतुर्वेदी, रश्मी ठाकरे यांच्यावर देखील कारवाई होणार आणि या सर्वाच उत्तर मीच देणार, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.