बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप

बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप

उत्तर प्रदेशमधील एका विद्यार्थिनीने बहुजन समाज पार्टीच्या (BSP) एका नेत्यावर मोठा आरोप केला आहे. झाशी येथील एका विद्यार्थिनीने बुंदेलखंडचे बहुजन समाज पार्टीचे प्रभारी लालाराम अहिरवार यांच्यावर अपहरणाचा आरोप केला आहे. विद्यार्थिनीच्या लग्नाच्या आधी तिचे अपहरण केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी बसपा नेते लालाराम अहिरवार यांच्यासह चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थिनीचं लग्न २१ एप्रिल रोजी होणार होतं. त्यामुळे १८ एप्रिल रोजी ही विद्यार्थिनी तिच्या मित्राला लग्नपत्रिका देण्यासाठी तेहरौली इथे गेली होती. त्यावेळी तीन तरुणांनी तिचं अपहरण केलं. मध्य प्रदेशमधील टिकमगड जिल्ह्यातील बसपा नेते लालाराम अहिरवार, नीरज आणि अंकित यांनी तिचं अपहरण केल्याचा आरोप विद्यार्थिनीनं केला आहे.

तीन दिवस विद्यार्थिनीला राजगड येथील लालाराम अहिरवार यांच्या घरी ठेवलं आणि नंतर मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील पठारी इथं राहणाऱ्या आशुला विकलं. दरम्यान, विद्यार्थिनी घरी न पोहोचल्यामुळं कुटुंबीयांनी तेहरौली पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, मुलीचा शोध लागला नाही.

हे ही वाचा:

‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’

महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न

‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?

ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार

विद्यार्थिनीला ज्या ठिकाणी विकण्यात आलं होतं, तिथून या मुलीने चतुराईने मोबाईलवरून वडिलांना संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर मुलीच्या वडिलांनी कुटुंबीयांसह दतिया जिल्ह्यातील पाथरी गावात पोहचून विद्यार्थिनीची सुटका केली. त्यानंतर वडिलांनी तेहरौली पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विद्यार्थिनीचा न्यायालयात जबाब नोंदवला आहे.

Exit mobile version