भाजपाकडून तमिळनाडूत खुशबू सुंदर यांना उमेदवारी

भाजपाकडून तमिळनाडूत खुशबू सुंदर यांना उमेदवारी

भारतातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तमिळनाडूतील निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहिर झाली आहे. या यादीत खुशबू सुंदर यांचे नाव देखील आहे.

आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात द्रविड मुनेत्र कझघम् (डीएमके) पासून करणाऱ्या खुशबू सुंदर भाजपात येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये देखील होत्या. डीएमकेमध्ये त्यांनी प्रवेश करुणानिधी यांच्या समोर १४ मे २०१० रोजी केला होता. त्यानंतर त्यांनी डीएमकेला राम राम ठोकला आणि १६ जून २०१४ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०१४ रोजी काँग्रेस पक्षाच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यासुद्धा होत्या.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

सचिन वाझे कोर्टात हजर

सुशांतच्या प्रकरणातील गुपितांमुळे वाझेंचा बचाव?

त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष देखील सोडला. काँग्रेस पक्षातून १२ ऑक्टोबर २०२० रोजी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्या आता थाऊजंड लाईट्स या मतदारसंघातून तमिळनाडू विधानसभेची निवडणूूक भाजपाच्या तिकिटावर लढवणार आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी खुशबू यांनी काही चित्रपटात देखील कम केले आहे. १९८० साली आलेल्या द बर्निंग ट्रेन या चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. त्यानंतरच्या काळात त्या बाल कलाकार म्हणून नसीब, लावारीस, कालिआ, दर्द का रिश्ता, बेमिसाल अशा विविध चित्रपटांमधून झळकल्या होत्या. त्याबरोबरच काही चित्रपटांमधून त्या गाण्यांतूनही पडद्यावर दिसल्या होत्या.

हिंदी बरोबरच कलियुगा पांडावुलू या तमिळ चित्रपटापासून त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला सुरूवात केली होती. तमिळ चित्रपटसृष्टीतील रजनिकांत, कमल हसन, विजयकांत, सारथ कुमार इत्यादी अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले होते.

Exit mobile version