मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याचे पैसे संजय राऊतांच्या बंधू, लेकीच्या खात्यात

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला गौप्यस्फोट

मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याचे पैसे संजय राऊतांच्या बंधू, लेकीच्या खात्यात

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक झाली आहे. या अटकेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत. तसेच त्यांनी या वेळी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“मुंबई महापालिकेने ५० कंत्राटदारांसोबत १३२ कोटी रुपयांचे खिचडी कॉन्ट्रॅक्ट केले त्यांना पैसेही दिले. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांच्या नामी- बेनामी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. यावेळी सुरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये दिले गेले. असे तीन- चार कोटी गेले आहेत. अमोल गजानन किर्तीकर यांच्या खात्यातही पैसे गेलेले आहेत. सुजित पाटकर यालाही पैसे देण्यात आले. हे कोट्यवधी रुपये देण्यात आले ते केवळ खिचडी कन्सल्टंसीसाठी,” असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“महापालिकेतील रेकॉर्ड्सनुसार, ५० पैकी २० कंत्राटदारांनी ही खिचडी कुठे पोहचवली, किती पोहचवली याची नोंदचं नाही. संजय राऊत यांच्या मित्र परिवारांच्या खात्यात लाखो रुपये गेलेले आहेत. संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत हिच्या खात्यात १४ लाख रुपये, बंधू संदीप राऊत यांच्या खात्यात जवळपास ६ लाख, सुजित पाटकर याच्या खात्यात ४० लाख रुपये भरण्यात आले. त्यामुळे करोना काळात गोरगरीबांसाठी असलेली खिचडी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्ती लोकांनी खाल्ली आहे,” असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा:

हुती गटाच्या हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर!

पाकिस्तानचा पलटवार; इराणवर एअर स्ट्राईक

धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

या प्रकरणात ज्यांची नावे आहेत आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, त्यांना ईडीने बोलावून चौकशी करावी अशी मागणी केली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Exit mobile version