काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना अखेर गुडघे टेकावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य विधानाबद्दल आसाम पोलिसांनी त्यांनी विमानतळावरच अटक केली होती. त्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय़ घेतला पण खेरा हे बिनशर्त माफी मागतील या अटीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
यासंदर्भात काँग्रेसच्या वतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकादार (पवन खेरा) हे बिनशर्त माफी मागतील. असे विधान करण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक कोणताही प्रयत्न नव्हता. त्यावर सॉलिसिटर जनरल भाटी यांनी खेरा यांचे वक्तव्य जाणीवपूर्वकच केलेले होते यावर भर दिला.
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत खेरा यांनी म्हटले होते की, जर नरसिंहाराव यांच्या काळात संसदीय समितीची स्थापना होते, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अशी समिती स्थापन होते तर मग नरेंद्र गौतमदास…सॉरी दामोदरदास मोदी यांच्या काळात का होत नाही? त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. रायपूर येथे काँग्रेस अधिवेशनासाठी जात असतानाच त्यांना विमानातून उतरवून त्यांना अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा
एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे
परिसरासोबतच मने साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला
त्यानंतर काँग्रेसने भाजपावर टीका केली होती आणि सर्वोच्च न्यायालयात या अटकेच्या विरोधात ते गेले होते. त्यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आले. त्यांनी खेरा यांना जामीन मंजूर केला. तसेच पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला ठेवली.
यावेळी अभिषेक मनू संघवी यांनी खेरा हे बिनशर्त माफी मागतील असे आश्वासन दिले. संघवी म्हणाले की, खेरा यांची जीभ घसरली. त्यांनी याआधीच माफीही मागितलेली आहे. गौतमदास की दामोदरदास याविषयी मी गोंधळात सापडलो होतो. पण ती माझी चूक होती. मला अटक होऊ नये, अशी विनंती खेरा यांनी केली होती.