किरीट सोमय्या हे आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी आणि रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून दापोलीकडे रवाना झाले आहेत. सकाळी साधारण शंभर गाड्यांचा ताफा घेऊन किरीट सोमय्या हे दापोली येथे रवाना झाले.
प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, कशेडी घाटत किरीट सोमय्या यांचा ताफा पोहचताच त्यांना खेड पोलिसांनी अडवलं. तसेच त्यांना नोटीस घेण्यास सांगितले. मात्र, यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात वाद झल्याचे दिसून आले.
जमावबंदीचा आदेश आहे, असे पोलिसांनी यावेळी सोमय्यांना सांगितले. मात्र, मला झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे फिरणं कसे नाकारता? ही नोटीस बेकायदेशीर आहे. मी कशी स्वीकारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केला. यापूर्वी तुम्ही कुणाला थांबवलंत का? कालपर्यंत सर्व गाड्यांना तुम्ही नोटीस दिलीत का? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले. पोलिसांनी दिलेली नोटीस किरीट सोमय्या यांनी सही न करताच स्वीकारली. त्यानंतर गाडीत बसून किरीट सोमय्या पुन्हा दापोलीकडे रवाना झाले.
हे ही वाचा:
‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’
आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने
उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?
मुख्यमंत्री योगींच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा!
मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या निवासस्थानापासून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. घरातून निघण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही दाखवला.