विदेशातील खलिस्तान समर्थकांची शेतकरी आंदोलनाला रसद

विदेशातील खलिस्तान समर्थकांची शेतकरी आंदोलनाला रसद

काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांच्याशी रविवारी आंदोलनकर्त्यांनी दुर्वव्यवहार केला. सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनात बिट्टू गेले असताना त्यांची पगडी काढण्याचाही प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर कृषीविषयक कायद्यांविरोधात २ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बिट्टू आंदोलनस्थळी गेले होते.

“युनियन लीडर्सनी बोलवलेल्या बैठकीसाठी आम्ही तिथे गेलो होतो. तिथे पोचताच आमच्यावर हल्ला करण्यात आला. तिथे अनेक लोकं हल्ला करण्यासाठी टपलेलेच होते. त्यांनी लाठ्याकाठ्या आणि इतर हत्यारं तयार ठेवली होती. पण तूर्तास आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही कारण आंदोलन अजूनही सुरूच आहे.” अशी माहिती लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी दिली.

“आंदोलनकर्त्यांना खालिस्तान्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहे. खालिस्तानी झेंडे सुद्धा काही लोकांकडून फडकवले जात आहेत. परंतु आंदोलनकर्ते नेते तरी एवढ्या मोठ्या संख्येतून अशी अराजक तत्व कशी शोधून काढणार? त्यांना झेंडा फडकवण्यासाठी ८० लाख ते एक कोटी रुपये मिळत आहेत. या संगठनांच्या निशाण्यावर मी पूर्वीपासूनच आहे.” असेही बिट्टू यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या सर्व खासदारांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

Exit mobile version