खलिस्तानी समर्थकांकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग

निज्जरच्या मृत्यूशी संबंधित बातमीही दाखवली जात आहे.

खलिस्तानी समर्थकांकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाला खलिस्तानी समर्थकांनी आग लावली. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. तसेच, आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या सर्व घटनेचा अमेरिकी सरकारने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

 

‘सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दुतावासाला लागलेल्या आगीच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. अमेरिकेतील अन्य देशांच्या दूतावासाची तोडफोड करणे किंवा हल्ले करणे हा गुन्हा आहे,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यु मिलर यांनी या घटनेनंतर दिली आहे.

 

तिकडे, खलिस्तानी समर्थकांनी दोन भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका खलिस्तानी दशतवाद्याच्या मृत्यूप्रकरणी त्यांना जबाबदार ठरवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यावर भारताने कठोर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अनेक देशांमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावाही घेतला जात आहे. ८ जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?

उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी

२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट

फ्रान्समध्ये हिंसाचार प्रकरणी ३ हजार अटकेत; बहुसंख्य मुस्लिमांचा समावेश

खलिस्तानी समर्थकांनी २ जुलै रोजी एक व्हिडीओ ट्विटरवर दिला आहे. त्यात सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाला आग लागल्याचे दिसत आहे. त्यामध्ये ‘हिंसेतून हिंसेचा जन्म होतो,’ असे लिहिले आहे. या व्हिडीओत ‘खलिस्तानी टायगर फोर्स’चा प्रमुख हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूशी संबंधित बातमीही दाखवली जात आहे.

 

Exit mobile version