काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १० जानेवारीला पंजाबमध्ये पोहोचणार आहे. त्याचवेळी भारतात बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी समर्थक संघटना सिख फॉर जस्टिसने यात्रा थांबवण्याची धमकी दिली आहे. पंजाबमधील एका कॉलेजच्या भिंतीवर ही धमकी लिहिली आहे. यासोबतच भिंतींवर काँग्रेसच्या विरोधात घोषणाही लिहिण्यात आल्या आहेत.
शीख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी पंजाबमध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा बंद करण्याची हाक दिली आहे. शीख फॉर जस्टिसचे नेते पन्नू यांनीही एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यात राहुल गांधींच्या नावासह आक्षेपार्ह घोषणा भिंतींवर लिहिलेल्या दिसत आहेत. गुरुपतवंतने जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये ते मुक्तसर साहिबला जात असून हा मुक्तसर साहिब येथील एका महाविद्यालयातील व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण भारतातून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश नंतर राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. राजस्थाननंतर ही यात्रा १० जानेवारीला हरियाणा आणि त्यानंतर आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये प्रवेश करेल.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? स्था
यी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
खुद्द राहुल गांधी यांनी १० जानेवारी रोजी पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेचे आगमन होणार असल्याची माहिती दिली होती . राहुल गांधींनी दिलेल्या माहितीनंतरच खलिस्तान समर्थक संघटनेने पंजाबमधील भारत जोडो यात्रा थांबवण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे, शीख फॉर जस्टिसने काँग्रेसच्या भेटीला धमकी दिल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर पंजाब पोलीस सतर्क झाले असून त्यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.