लखीमपूर प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन?

लखीमपूर प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन?

लखीमपूर येथे चार शेतकऱ्यांच्या गाडीखाली चिरडून मृत्यु झाल्याच्या प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

याठिकाणच्या काही व्हीडिओतून ही बाब पुढे येऊ लागली आहे. हा वाद भडकाविण्यात खलिस्तानींचा हात आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. यामागे कारण असे की, येथे झालेल्या या घटनेनंतर तिथे आंदोलकांपैकी एकाच्या टीशर्टवर भिंद्रनवाले यांचे चित्र दिसते आहे. त्यामुळे खलिस्तानींसोबत पाकिस्तानचा हातही या प्रकरणामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात काही व्हीडिओ समोर आले आहेत, त्यात आंदोलक आणि पोलिस दिसत आहेत. पोलिस अधिकारी कुणाशी तरी फोनवर बोलत जात असताना त्यांच्याजवळ एक निळी पगडी धारण केलेली व्यक्ती भिंद्रनवाले यांचे चित्र असलेला टीशर्ट घालून उभा असलेला दिसतो. त्या टीशर्टच्या मागील बाजूसही खलिस्तानची मागणी करणारा संदेश दिसतो. त्या व्हीडिओत खलिस्तानी समर्थकही घोषणाबाजी करताना दिसतात.

 

हे ही वाचा:

सकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात!

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

बोरिवली स्थानक परिसरात ‘दंगा करतोय रिक्षावाला!’

हमी कालावधीतच खड्डे पडण्याची हमी!

 

दानवीर सिंग नावाच्या एका नेटकऱ्याने हा व्हीडिओ शेअर करत याचा खलिस्तानशी काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. एकाने या व्हीडिओखाली प्रतिक्रिया लिहिली आहे की, जर हे शेतकरी आंदोलक आहेत त्यापैकी एकाच्या टीशर्टवर भिंद्रनवालेंचे चित्र कसे काय? स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारा संदेश कसा काय टीशर्टवर दिसत आहे. हे लोक गाडीवर विटेचे तुकडे आणि लाठ्याकाठ्यांनी कसा काय हल्ला करत आहेत?

Exit mobile version