ईडीच्या चौकशीची तारीख आली, की खडसेंना कोरोना होतो

ईडीच्या चौकशीची तारीख आली, की खडसेंना कोरोना होतो

“ईडीकडून चौकशीची तारीख आली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोना होतो,” असा खोचक टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला. ते माध्यमांशी जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंवर जोरदार प्रहार केला.

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैमनस्य कधी लपून राहिलेले नाही. संधी मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. भाजपामध्ये झालेल्या कोंडीमुळे खडसे यांनी पक्षांतर केल्यामुळे तर गिरीश महाजन त्यांच्यावर उघडपणे शाब्दिक प्रहार करताना दिसतात. यावेळीदेखील महाजन यांनी खडसेंना घेरण्याची संधी सोडली नाही. मागील काही दिवासांपासून खडसेंच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. तसेच आतापर्यंत खडसे यांना तीन वेळा कोरोनाची आणि कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन महाजन यांनी खडसेंना घेरलंय. जेव्हा जेव्हा ईडीकडून चौकशीची तारीख येते, तेव्हा तेव्हा खडसे यांना कोरोनाची लागण होते; असं म्हणत महाजन यांनी खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा:

११ लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम- अतुल भातखळकर

पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घ्यावी; बार असोसिएशनची विनंती

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

राजकीय नेतृत्वानेच केली वाझेची नियुक्ती…राऊतांनीच दिली पुष्टी

राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसेंनासुद्धा आतापर्यंत तीन वेळा कोरोना आणि कोरोनासदृश लक्षणे दिसून आली आहेत. त्यांची सर्वांत अधी १९ नोव्हेंबर २०२० रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ट्विटरवर त्यांनी तशी माहिती दिली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Exit mobile version