25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामाखडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार

खडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार

Google News Follow

Related

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. मंदाकिनी खडसे याप्रकरणातील आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.

अजामीनपात्र वॉरंटला तीन आठवड्यांची स्थगिती द्यावी अशी मागणी खडसेंच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली आहे. एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टानं वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा दिला आहे. एकनाख खडसे यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे ते सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं आहे. खडसेंच्या प्रकृतीची दखल घेत कोर्टानं प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

हे ही वाचा:

दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही आता मिळणार कोवॅक्सिन

पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु तूर्तास कोणतीही सीडी बाहेर आलेली नाही. भाजपा नेते गिरीश महाजन यांनी या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंना टोलाही लगावला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा