28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणकोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

Google News Follow

Related

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबतच देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे पार पडणार आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळाच्या सदस्यांव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं थौमान घातलं आहे. अशातच याकाळातील केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक असणार आहे. या बैठकीत १८ ते ४४ नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. १ मेपासून लसीकरणाचा हा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मंत्र्यांना जनतेसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. यापूर्वी पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती.

हे ही वाचा:

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सावात मोठी दुर्घटना

रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये सलाईनचं पाणी, बीडमधील धक्कादायक प्रकार

पुणे कोविड वाॅर रूमची विशेष व्हाॅट्सॲप सुविधा

पंतप्रधानांच्या वरिष्ठ सरकारी अधिकारी, औषध निर्माच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, ऑक्सिजन निर्मात्या कंपन्या, लष्कर, वायुसेना यांच्या प्रमुखांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकींचं सत्र सुरुच आहे. भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. गेल्या २४ तासात देशात ३,८६,४५२ नव्या रुग्णांची भर पडली असून ३४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. गेल्या २४ तासात २,९७,५४० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी देशात ३.७९ लाख नव्या रुग्णांची भर पडली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा