वकिलांनी केली राज्यपालांकडे मागणी
अभिनेत्री केतकी चितळेसंदर्भातील प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची विनंती केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून केली आहे. राज्यपालांच्या निवासस्थानी राजभवन येथे जाऊन देशपांडे यांनी आपले निवेदन राज्यपालांना दिलेले आहे.
यात देशपांडे यांनी म्हटले आहे की, केतकी चितळेप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, जेणेकरून या प्रकरणाच्या मास्टरमाइंडला जेरबंद करणे शक्य होईल.
दुसरी मागणी करण्यात आली आहे की, केतकी चितळेवर कळंबोली पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडे असलेला अहवाल राज्यपालांकडे सुपूर्द करावा. केतकी चितळेला न्याय देण्यासाठी तिच्यावतीने अनेकवेळा पोलिसांशी संपर्क साधण्यात येऊनही तिचे ऐकले न गेल्याबद्दल गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात यावे.
शिवाय, केतकी चितळेवर जो हल्ला झाला त्याबद्दल आणि तिच्याविरोधात करण्यात आलेल्या अनेक एफआयआरबाबत सीबीआयमार्फत चौकशी का होऊ नये, अशी विचारणा महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला करण्यात यावी. केतकीविरोधात बोगस एफआयआर दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जाऊ नये?
हे ही वाचा:
‘प्रोजेक्ट शेरनी’चे फुटले बिंग!
‘घोडेबाजार’ शब्दावरून अपक्ष नाराज
आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात
हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक
या निवेदनात देशपांडे यांनी असेही म्हटले आहे की, विधान परिषदेवर आमदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेल्या आदिती नलावडे यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही? या आदिती नलावडे यांनी २० गुंडांच्या सहाय्याने केतकीवर हल्ला केला. केतकीला पोलिसांमार्फत गाडीत बसविण्यात येत होते, तेव्हा या महिलांनी केतकीशी धक्काबुक्की केली. आदिती नलावडे यांनी केतकीला थप्पड लगावली आणि ठोसेही मारले.
यावरून आदिती नलावडे यांनी १४३, १४५, १४६, १८६, १८८, १८९, ३५३, ३२३, ३५४, ५०३, ५०४, आणि १२० बी या अंतर्गत अपराध केला आहे. टीव्ही वाहिन्यांनी तर आदिती नलावडे यांची मुलाखत घेतली त्यात नलावडे यांनी या मारहाणीची जबाबदारी घेतली असून हा हल्ला पूर्वनियोजित होता, अशीही कबुली दिली आहे.