केतकी चितळेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या प्रकरणी तिला पोलीस कोठडी झाली होती त्यांनतर अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांनतर तिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने तिला आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
२०२० च्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक करण्यात आली आहे. २०२० मध्ये राबळे पोलीस ठाण्यात केतकीवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यावर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला
निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी
आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी
१ मार्च २०२० रोजी केतकीने फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. केतकीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो”. अशी पोस्ट केतकीने केली होती. याच प्रकरणात तिच्यावर तेव्हा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.