केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी केतकी चितळे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळे हिला ताब्यात घेतले आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक पोस्ट केतकी हिने शेअर केली असून या पोस्टनंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे.

वकील नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली असून यात कवितेच्या स्वरूपातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून केतकी हिच्यावर टीका करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रक जारी करत केतकी चितळेच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

हे ही वाचा:

चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”

शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली होती. कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version