29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणराजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार  

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार  

Google News Follow

Related

गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारचे आणि नेत्यांचे विविध घोटाळे बाहेर आले या पार्श्वभूमीवर भाजपाने घोटाळेबाजांसाठी पुरस्कारांची घोषणा केली आहे. घोटाळेरत्न, घोटाळेवैभव, घोटाळेभूषण, घोटाळेसम्राट असे हे पुरस्कार आहेत. त्यातील घोटाळेरत्न हा पुरस्कार राजेश टोपे यांना जाहीर झाल्याचे राज्य भाजपाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही घोषणा केली.

गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारचे आणि नेत्यांचे विविध घोटाळे बाहेर आले याच पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे नाव ठळक करणाऱ्या ज्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या, त्यामध्ये वरच्या क्रमांकावर असलेल्या घोटाळ्यांचे संपूर्ण श्रेय ठाकरे सरकारला द्यावेच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील अनेक परीक्षा घोटाळे समोर आले आहेत. हजारो उमेदवारांचे, विद्यार्थ्यांचे हाल करून उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलण्याची कर्तबगारी दाखविल्याबद्दल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना या सत्कार मालिकेतील पहिला मानाचा ‘घोटाळेरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार या मोहिमेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले. घोटाळे करून त्यावर माफी मागण्याचा मोठेपणा दाखविणारे टोपे हे ठाकरे सरकारमधील एकमेव मंत्री असल्याने, ते या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरल्याचा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

देशभर महाराष्ट्राचे नाव करणाऱ्या या सरकारच्या कर्तबगारीची योग्य ती दखल भाजपने घ्यायची ठरवले आहे. या घोटाळ्यांमध्ये जबाबदार असलेल्यांचा सन्मान करण्याचे भाजपने ठरवले असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या सरकारमधील घोटाळेबाज मानकऱ्यांना घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राट असे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी घोषणा केशव उपाध्ये यांनी बुधवारी २९ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत केली.

हे ही वाचा:

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

‘मुख्यमंत्र्यांचे पत्र धमकीवजा’

मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले

अनिल देशमुख यांनाही हा पुरस्कार देण्याचा भाजपचा विचार होता. मात्र, त्याआधीच त्यांना मंत्रिपदावरून जावे लागल्याने ते या सर्वोच्च पुरस्कारास मुकले आहेत. राजेश टोपे यांच्या आरोग्य खात्याचा घोटाळा जसा बाहेर आला तसा इतर अनेक खात्यांतील घोटाळेही उघडकीस येत असल्याने, अशा खातेप्रमुख मंत्र्यांनाही विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट अशा पुरस्कारांचा समावेश आहे. घोटाळ्यांच्या मालिकेतील सर्वोच्च मानाचा असा ‘जीवन गौरव पुरस्कार’ या पुरस्कार मालिकेत प्रदान करण्यात येणार असून त्याचा मानकरी निवडण्याकरिता लवकरच जनतेचा कौल घेण्याची राज्यव्यापी मोहीम हाती घेणार असल्याचे उपाध्ये म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा