उत्तर प्रदेश की विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मथुरा येथील कृष्ण जन्मभूमिवर मंदिर निर्माणाची तयारी सुरू केली आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. याला कारण आहे उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलेले एक ट्विट.
उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बुधवार, १ डिसेंबर रोजी एक ट्विट केले आहे. “अयोध्या काशी भव्य मंदिर निर्माण जारी है, मथुरा की तैयारी है” असे मौर्य यांनी लिहिले आहे. अर्थात ‘अयोध्या काशी येथे भव्य मंदिर निर्माण होत आहे आणि मथुरा साठी तयारी सुरू आहे’ असे मौर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत कृष्ण जन्मभूमीवर मंदिर निर्माणाचा मुद्दा गाजणार असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
हे ही वाचा:
उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!
…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते
‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’
दरम्यान उत्तर प्रदेशातील कृष्ण जन्मभूमी असलेल्या मथुरा येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मथुरा मधील कृष्ण जन्मभूमी आणि या ठिकाणी असलेली शाही इदगाह मस्जिद याचा वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता स्थानिक पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मथुरा शहरात कलम १४४ लागू केले आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभा या हिंदुत्ववादी संघटनेने ६ डिसेंबर रोजी मथुरा येथील शाही इदगाह येथे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करून त्याला जलाभिषेक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे.