केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान  हे त्यांच्या खुल्या विचारांसाठी ओळखले तर जातातच पण देशात हिंदूंबाबत निर्माण झालेल्या चुकीच्या संकल्पनांना ते विरोधही करतात. आज एका कार्यक्रमात त्यांनी “जो कोणी भारतात जन्माला आला आहे तो हिंदू आहे”अस म्हणाले.

ते पूढे म्हणाले की, मी ‘हिंदू’ ही धार्मिक संज्ञा मानत नाही तर भौगोलिक संज्ञा मानतो. जो कोणी भारतात जन्माला येतो, जो भारतात पिकवलेले अन्न खातो, जो भारतातील नद्यांचे पाणी पितो, तो हिंदू म्हणण्यास पात्र, असही आरिफ मोहम्मद म्हणाले.  त्यांनी प्रत्येक भारतीय लोकांना हिंदू म्हणण्याचे आवाहनही केले  आहे. आर्य समाजातर्फे आयोजित जाहीर सभेत खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

आरिफ मोहम्मद यांचा सवाल

बीबीसीच्या ‘इंडिया ‘द मोदी क्वेश्चन’ या  माहितीपटाची   सध्या चर्चा होत आहे. त्यातच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या  माहितीपटाच्या निर्मात्यांनी ब्रिटिश अत्याचारांवर आतापर्यंत डॉक्युमेंट्री का बनवली नाही, असा सवाल केला आहे. भारत जगभरात चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे या लोकांची निराशा होत आहे.

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, मला काही लोकांबद्दल खेद वाटतो कारण ते न्यायव्यवस्थेच्या निर्णयांवर नव्हे तर दाखवत असलेल्या माहितीपटावर अवलंबून असतात.

हे ही वाचा:

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

दरम्यान, या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने असेही म्हटले आहे की, हे विधान ‘आरएसएसच्या अजेंड्या’चा एक भाग आहे आणि राज्यपाल केंद्राच्या निर्देशानुसार काम करत असल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version