मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अवैध आर्थिक व्यवहारात सामील झाल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कस्टम विभागाने काही खळबळजनक दावे केले आहेत. सीमा शुल्क आयुक्त (निवारक) सुमित कुमार यांनी हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. डॉलर तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याविषयी युएईच्या माजी कौन्सिल जनरलशी संबंधाबाबत वक्तव्य केले होते.
निवेदनातील १०८ आणि १६४ व्या वाक्यात स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री, केरळ विधानसभेचे सभापती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या काही मंत्र्यांविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. युएईच्या माजी वाणिज्य दूतांशी मुख्यमंत्र्यांचे असलेले घनिष्ट संबंध आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार याबद्दल त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मुख्यमंत्री, त्यांचे प्रधान सचिव आणि वैयक्तिक कर्मचार्यांशी तिचा जवळचा संबंधही स्वप्ना सुरेशने उघडकीस आणला. असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
हे ही पाहा:
केरळमध्ये भाजपा चमत्कार करणार का राहुल गांधींचा नाच कांग्रेसला तारणार?
स्वप्ना सुरेशच्या निवेदनामधून वेगवेगळी बेकायदेशीर ‘डील’ करून मोठ्या पदावरील बड्या व्यक्तींना फायदा झाल्याचे नमूद केले आहे. “स्वप्ना सुरेशने असे सांगितले होते की ती अरबी भाषेमध्ये निपुण असल्यानेच तिला या सर्व व्यवहाराची माहिती आहे. म्हणूनच ती या सर्व प्रकाराची साक्षीदार होती. यामुळेच वरील व्यक्ती आणि मध्य पूर्वेतील व्यक्ती यांच्यात अनुवादक म्हणून काम करण्यास तिला भाग पाडले गेले.” असे उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.