केजरीवाल ईडी चौकशीला जाणार नाहीत

मध्य प्रदेशमध्ये प्रचारासाठी हजर राहणार

केजरीवाल ईडी चौकशीला जाणार नाहीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवार, २ नोव्हेंबर रोजी मद्य धोरण प्रकरणी  चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तपास यंत्रणा ईडीसमोर हजर राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. केजरीवाल यांना ३० ऑक्टोबरला चौकशीसाठी समन्स पाठवले होते.

अरविंद केजरीवाल हे चौकशीला हजर राहणार नाहीत. अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मध्यप्रदेशातील सिंगरौली येथे रॅली घेणार आहेत. मध्य प्रदेशात सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलविले होते. केजरीवाल काल रात्रीपर्यंत चौकशीला जाणार असे पक्के होते. परंतु, आज सकाळीच ईडीने दिल्लीचे आणखी एक मंत्री राज कुमार आनंद यांच्या घरावर छापेमारी केली आहे. केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे २ नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत. यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच ईडीची नोटीस बेकायदेशीर आहे. भाजपाच्या सांगण्यावरून ईडीने ही नोटीस पाठविली आहे. जेणेकरून चार राज्यांमध्ये प्रचाराला जाऊ नये, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

हे ही वाचा:

बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले

डोंबिवलीत लहान मुलांच्या गेम झोनमध्ये पाचवर्षीय मुलाचा मृत्यू!

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

अरविंद केजरीवाल यांना ३० ऑक्टोबरला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. यासंदर्भात केजरीवाल यांनी ईडीला उत्तर पाठवून ही नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांनी ईडीच्या नोटीसीवर उत्तर दिले आहे. यामध्ये ईडीने ही नोटीस त्वरीत मागे घ्यावी, असे म्हटले आहे. तसेच केजरीवाल ईडीच्या चौकशीला जाणार नसून ते मध्य प्रदेशच्या सिंगरौलीमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार आहेत.

Exit mobile version