केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याला नायब राज्यपालांचा ‘रेड सिग्नल’

केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याला नायब राज्यपालांचा ‘रेड सिग्नल’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंगापूरला जाऊ शकणार नाहीत. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी या दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. ही महापौरांची बैठक असल्याचे नायब राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांना १ ऑगस्ट रोजी एका परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जायचे होते. आवश्यक प्रक्रियेअंतर्गत, दिल्ली सरकारने एलजीकडे मंजुरी मागितली होती, परंतु ही फाईल बराच काळ प्रलंबित होती.

सिंगापूर परिषद महापौरांची आहे, मुख्यमंत्र्यांनी तेथे जाण्याचे कोणतेही औचित्य नाही असे नायब राज्यपाल कार्यालयाने फाईल फेटाळताना स्पष्ट केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. मंजुरीला विलंब होत असल्याने त्यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून “एवढ्या महत्त्वाच्या टप्प्यावर मुख्यमंत्र्यांना भेट देण्यापासून रोखणे देशाच्या हिताच्या विरुद्ध आहे,” असे ते म्हणाले होते.त्याचवेळी आम आदमी पक्षही प्रवासाला परवानगी देण्याची मागणी सातत्याने करत होता. केजरीवाल शिक्षण आणि आरोग्याबाबत दिल्लीत केलेल्या कामांची माहिती देतील, त्यामुळे देशाची मान उंचावेल असा पक्षाचा युक्तिवाद होता.

हे ही वाचा:

आरे व्वा! शिंदे-फडणवीस सरकारने कारशेडवरील बंदी उठविली

व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा

लोकसभेच्या गटनेतेपदावरून विनायक राऊतांची न्यायालयात धाव

भारताच्या दाेन महिला धावपटू उत्तेजक चाचणीत आढळल्या दाेषी; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार

थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करणार: सिसोदिया

नायब राज्यपालांनी फाइल नाकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, नायब राज्यपालांनी दिलेल्या कारणाशी ते सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांना हे वैयक्तिक निमंत्रण आहे. सिंगापूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही चुकीच्या परंपरेची नांदी असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version