गेल्या दोन टर्म भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षनेते आता जंग जंग पछाडत आहेत. आता नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या मनातली खदखद सांगितली आहे.
पण हे सांगत असताना तपास यंत्रणांचा वापर करू नका, असे सुचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या नऊजणांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, भगवंत मान, अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.
पण यात काँग्रेसचे मात्र समावेशच नाही. शिवाय, डाव्या पक्षांचाही समावेश नाही. विशेष म्हणजे यात लालू प्रसाद यादव यांच्यावरील कारवाईचाही उल्लेख केला आहे. या पत्रावर सही केलेल्या अरविंद केजरीवाल यांनी एकप्रकारे आपल्या पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा उल्लेख करताना लालूंचे नाव घेतले आहे. पण याआधी मात्र याच लालू प्रसाद यादव यांच्यावर केजरीवाल तुटून पडले होते. चारा घोटाळ्याच्या निमित्ताने २०१३मध्ये केजरीवाल यांनी लालूप्रसाद यांचा समाचार घेतला होता.
हे ही वाचा:
९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…
अटक वारंट घेऊन पोलीस धडकले इम्रान खानच्या घरी.. कधीही होऊ शकते अटक
विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य
कसब्यावर बोलू काही…भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?
तेव्हा त्यांनी ट्विटरवर लिहिले होते की, लालू यांनी चारा घोटाळ्यात कोट्यवधींची कमाई केली. पण ते पैसे परत मिळाले नाहीत. त्यावर केवळ २५ लाखांचा दंड बसला आणि काही वर्षे त्यांना जेल झाली. त्याच दिवशी त्यांनी आणखी एक ट्विट केले होते की, अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाला लालूंनी म्हणूनच विरोध केला होता. केजरीवाल यांनी असाही सवाल उपस्थित केला होता की, कठोर असा भ्रष्टाचारविरोधी कायदा असेल का की आपण लालू, मुलायम, सिब्बल, चिदू (पी. चिदंबरम) यांना सर्वोच्च मानणार आहोत.
केजरीवाल आज या सगळ्यांसोबत दिसत असले तरी २०२०मध्ये ते म्हणाले होते की, भाजपा, काँग्रेस, जनता दल, राजद हे सगळे पक्ष आपल्याला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेत जिथे आपण भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांचे ट्विट होते, एकीकडे भाजपा, जदयू, एलजेपी, काँग्रेस, राजद आणि दुसरीकडे शाळा, रुग्णालये, पाणी, वीज, महिलांना मोफत प्रवास, माझे उद्दीष्ट आहे भ्रष्टाचाराला हरवणे आणि दिल्लीला पुढे घेऊन जाणे.
भ्रष्टाचाराविरोधात उभे राहिलेले हेच केजरीवाल आता मात्र सिसोदियांच्या समर्थनासाठी लालूंची बाजूही घेत आहेत. एवढेच नव्हे तर सिसोदिया यांनीही लालूप्रसाद यादव यांच्या भ्रष्टाचारावर सडकून टीका केली होती. लालूप्रसाद यादव हे भ्रष्ट आहेत हे सांगण्यासाठी १७ वर्षे लागली असतील तर त्यांना शिक्षा होण्यासाठी किती वर्षे लागतील याची कल्पना केलेली बरी. सप्टेंबर २०१३ला त्यांनी हे ट्विट केले होते.