आम आदमी पार्टीतच्या नेत्यांमध्येच मतभिन्नता
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत केलेल्या भाषणात भाजपावर टीका करताना म्हटले होते की, तुम्हाला किती नोकऱ्या मिळाल्या, कुणाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली का, पण आम्ही १२ लाख मुलांना नोकऱ्या दिल्या. पण प्रत्यक्षात केजरीवाल यांचे हे वक्तव्य निखालस खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२१ फेब्रुवारीला झालेल्या एका रॅलीत त्यांनी जनसमुदायासमोर बोलताना आपल्या सरकारने जवळपास १० लाख मुलांना नोकरी दिल्याचे सांगितले होते पण पुढच्याच महिन्यात म्हणजे २४ मार्चला त्यांनी विधानसभेत बोलताना १२ लाख मुलांना नोकऱ्या दिल्याचे सांगत भाजपाला हिणवले.
https://t.co/ZgsWm5ME0Q
Arre baap re. AAP ke dalle.— Shrutish (Capt. Vikram Batra Stan Account) (@Shrutish8) March 26, 2022
२६ मार्चला याच विधानसभेत आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी आपल्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना खोटे पाडले. सिसोदिया म्हणाले की, आम्ही गेल्या सात वर्षांत दिल्लीतील युवकांना १ लाख ७८ हजार नोकऱ्या दिल्या. सिसोदिया यांनी भाषण करताना सांगितले की, दिल्लीतील युवकांना ५१ हजार नव्या नोकऱ्या दिल्या. विद्यापीठात अडीच हजार कायमस्वरूपी नोकऱ्या तर रुग्णालयांत ३ हजार कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात आल्या. सात वर्षांत २५ हजार युवकांना गेस्ट टीचर्सच्या रूपात नोकरीला ठेवण्यात आले. त्याशिवाय, स्वच्छता व सुरक्षाव्यवस्थेतही ५० हजार नोकऱ्या उपलब्ध करण्यात आल्या. अशा पद्धतीने सात वर्षांत १ लाख ७८ हजार नोकऱ्या दिल्या गेल्या.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर अनिल परबांचा रिसॉर्ट वाचवून दाखवा’
ठाकरे सरकारने माझ्या हत्येचा कट रचलाय
इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला ‘लव्ह जिहाद’, मुलीची हत्या
भारतीय लष्कराने चीनच्या सीमेजवळ केला दमदार सराव!
त्यामुळे एकीकडे आम आदमी पक्षाचे नेते सिसोदिया हे खोटे बोलत आहेत का की केजरीवाल हे खोटे बोलत आहेत, याविषयी आता शंका घेतली जाऊ लागली आहे. दोघेही विधानसभेतच वेगवेगळे नोकरीचे आकडे घेऊन समोर आले आहेत. त्यामुळे नेमक्या किती नोकऱ्या युवकांना देण्यात आल्या आहेत, याविषयीचे वास्तव आकडे अद्याप समोर आलेले नाहीत.