केजरीवाल बॅकफूटवर; आठव्या समन्सनंतर ईडीसोबत सहकार्य करण्याची तयारी

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी कारवाई

केजरीवाल बॅकफूटवर; आठव्या समन्सनंतर ईडीसोबत सहकार्य करण्याची तयारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल आठ वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. अशातच अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच आता ईडीसोबत सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे. केजरीवाल यांनी ईडीला उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, त्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सचा पर्याय समोर ठेवला आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल आठवेळा समन्स पाठवला आहे. न्यायालयात देखील हे प्रकरण गेलं आहे. आता कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी उत्तर देण्यास केजरीवाल तयार झाले आहेत. पण, त्यांनी एक अट ठेवली असून ते व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ईडीच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास तयार आहेत. तसेच त्यांना १२ तारखेनंतर तारीख देण्यास सुचवलं आहे.

हे ही वाचा:

लाच प्रकरणी NHAI च्या अधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

पश्चिम बंगालमध्ये १६ लाख बनावट मतदार

ईडीने यापूर्वी २ नोव्हेंबर २०२३ रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते. त्यानंतर २१ डिसेंबर २०२३ रोजी दुसरे समन्स पाठवले. पुढे ३ जानेवारी २०२४ रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना तिसरे समन्स पाठवले होते. १७ जानेवारी रोजी ईडीने चौथे समन्स पाठवले. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी ईडीने पाचवे समन्स पाठवले. १४ फेब्रुवारीला सहावे समन्स पाठवल्यानंतर ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला बोलावले, पण अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. २२ फेब्रुवारीला सातवे समन्स पाठवण्यात आले होते. तर, २७ फेब्रुवारी रोजी त्यांना आठवे समन्स पाठविण्यात आले होते. एजन्सीने पाठविलेले समन्स ‘बेकायदेशीर’ असल्याचे केजरीवाल यांनी म्हणत पत्र लिहून समन्स मागे घेण्याची मागणीही केली होती.

Exit mobile version